शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी सोमवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता मोठ्या उत्साहात आपले उमेदवारी महापालिकेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असल्याने आज जळगाव महानगरपालिका परिसरात राजकीय चैतन्य पाहायला मिळाले.