काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांचा तिरोडा गृहनगर असताना त्यांना नगराध्यक्ष पदी आपल्या पक्षाचा उमेदवाराला निवडून आणता येऊ शकले नाही, त्यामुळे काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपत आल्याची चर्चा सुरु झाली आहे. तिरोडा नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक ते चार मध्ये आठही नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवडून आले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाला मात्र या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. यावरुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या राजकीय