कोपरगाव: येसगाव शिवारातील कोल्हे वस्ती येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला
कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील कोल्हे वस्ती शिवारात आज ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता साधनाबाई बाबर या जनावरांना चारा आणण्यासाठी गेल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला मात्र याचवेळी त्यांच्या मुलाने धाडस करून पूढे येऊन आईला बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. जखमी बाबर यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. बिबट्याच्या सततच्या दर्शनाने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.