कारंजा: मौजा बोरी शेत शिवारात शेतकरी महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.. पोलिसांनी घेतली घटनेची नोंद
Karanja, Wardha | Oct 13, 2025 12 तारखेला साडेपाच ते सातच्या दरम्यान मौजा बोरी तालुका कारंजा शेत शिवारात विहिरीत उडी घेऊन शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. कांता रमेशराव बैगणे वय साठ वर्ष राहणार बोरी तालुका कारंजा असे मृतक महिलेचे नाव आहे.. मुलावर बँकेचे कर्ज असल्यामुळे शेतात नापिकी होत असल्यामुळे सदर महिला चिंतेत राहत होती.. यासंदर्भात दीपक रमेशराव बैगणे वय तीस वर्ष यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी आज सांगितले