यावल: यावल नगर परिषदेत छाननीत २८ अर्ज अवैध, नगराध्यक्ष नगरसेवक अर्जावर तक्रार, सायंकाळी पाच वाजेनंतर दिला जाणार निकाल
Yawal, Jalgaon | Nov 18, 2025 यावल नगरपरिषद च्या निवडणुकीत प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे सुरू झाली. यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया पाटील, नगरसेवक पदाचे उमेदवार अतुल पाटील व सुरेखा कोळी यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या यांची सुनावणी पूर्ण झाली असून सायंकाळी पाच वाजता निकाल दिला जाणार आहे दरम्यान छाननीत नगरसेवकांचे २८ नगराध्यक्ष चा एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.