भंडारा: भंडारा बसस्थानकावर ७५ वर्षीय वृद्धाची लाखाची रोकड लंपास; बॅगला चिरा मारून चोरट्याने साधला डल्ला
भंडारा शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने ७५ वर्षीय वृद्धाच्या बॅगमधून १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषवार्ड, बेला येथील रहिवासी वासुदेव बकारामजी उके हे दि. २२ डिसेंबर रोजी दुपारी १;३० वाजता दरम्यान पोस्ट ऑफिसमधून आर.डी.चे १ लाख रुपये काढून पायी बसस्थानकावर पोहोचले होते; तेथून मौदा येथे जाणाऱ्या बसमध्ये बसले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला असलेल्या कथ्या रंगाच्या लेदर बॅगची चैन उघडून आण