कन्नड: पिशोर नाक्यावर मार्केट कमिटीच्या नावाखाली शेतकऱ्याकडून 200 रुपये उकडल्याचा व्हिडिओत व्हायरल
कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकरी संकटात असतानाही आपली फुले मार्केटमध्ये घेऊन येत आहेत.मात्र, कन्नड शहरातील पिशोर नाका येथे धक्कादायक घटना घडली.मार्केट कमिटीच्या नावाने कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडून चक्क 200 रुपये उकडले.याबाबत कोणतीही पावती दिली नाही.शेतकऱ्याला विरोध केल्यास कानशिळात लगावण्याची धमकी देण्यात आली.ही संपूर्ण घटना व्हिडिओसह सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.