मुर्तीजापूर: जीतापूर रोडवरील रेल्वे रुळावरील खांबाला दुचाकी धडकल्याने १९ वर्षीय युवकाचा मृत्यू, शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
संदेश वामनराव चौरपगार वय ३६ वर्षे राहणार जीतापूर याने दिलेल्या फिर्यादीनुसार पंचशील नगरातील १९ वर्षीय सुरज देविदास खंडारे दुचाकी क्रमांक एमएच ३०/बीवाय ४१३६ ने जीतापुर कडे भरधाव व निष्काळजीपणे गुरुवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी पुर्वी सहा वाजता पूर्वी रेल्वे रुळावरील खांबाला दुचाकीची जबर लागल्याने झालेल्या अपघातात मृतक सुरज खंडारे हा स्वतः कारणीभूत असल्याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.