आमगाव: दासगाव खुर्द येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण, दासगाव खुर्द येथील घटना
Amgaon, Gondia | Nov 1, 2025 दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम दासगाव खुर्द येथील १७ वर्षीय मुलगी रहस्यमयीरीत्या बेपत्ता झाली आहे. तिला ग्राम बलमाटोला येथील २२ वर्षीय तरुणाने आमिष देऊन पळवून नेल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी दवनीवाडा पोलिसांत केली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली असून या घटनेसंदर्भात दवनीवाडा पोलिसांनी ३० ऑक्टोबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम १३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.