सावनेर: वलनी व भानेगाव येथे आमदार यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
Savner, Nagpur | Nov 4, 2025 आज दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी वलनी गावातील ( ₹१ कोटी १३ लक्ष ) व भानेगाव गावातील ( ₹६० लक्ष ) विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माझ्या शुभहस्ते संपन्न झाला.या विकासकामांमध्ये समाजभवन, रस्ते, पाणीपुरवठा, नाली बांधकाम तसेच सार्वजनिक सुविधा व गाव सौंदर्यीकरण अशा नागरिकांच्या जीवनमान उंचावणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.या सर्व विकासकामांमुळे वलनी व भानेगाव परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील आणि ग्रामस्थांना आधुनिक सोयीसुविधांचा लाभ मिळेल.