नंदुरबार: वासरू ने शेताच्या नुकसान केल्याच्या संशयावरून एकास बेदम मारहाण, रजाळे शिवारातील घटना
दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुपारी नंदुरबार तालुक्यातील रजाळे शिवारात कृष्णा वाघ यांच्या शेतात दुर्योधन वाघ यांच्या वासरू ने नुकसान केल्याच्या संशयावर दुर्योधन वाघ यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्यात दुर्योधन वाघ यांच्या फिर्यादनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.