पालम: हायवा ट्रक मधील माती काढत असताना वीज तारेला ट्रकचा स्पर्श होऊन ट्रक चालकाचा मृत्यू सातेगाव पाटीवरील घटना
Palam, Parbhani | Oct 16, 2025 हायवा ट्रक मधील माती खाली काढत असताना ट्रकचा एक भाग महावितरणच्या विज तारेला स्पर्श होऊन ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पालम तालुक्यातील सातेगाव पाटीजवळ 13 ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात 15 ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.