वर्धा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर एका रक्तरंजित हल्ल्यात झाले असून, जुन्या पुलगावात एका कुटुंबावर तलवार, दगड आणि लाठ्याकाठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली असल्याचे आज 13 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे