उमरखेड: शहरातील चौधरी लेआउट हनुमान मंदिर जवळच्या झाडाखाली उभी असलेली दुचाकी लंपास,उमरखेड पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी आकाश प्रल्हाद राठोड यांच्या तक्रारीनुसार 17 ऑक्टोबरला तीन वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने चौधरी लेआउट हनुमान मंदिर जवळच्या झाडाखाली उभी करून ठेवलेली फिर्यादीच्या भावाची वीस हजार रुपये किमतीची एम एच 29 बी एन 5863 या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली.याप्रकरणी 18 ऑक्टोबरला अंदाजे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास उमरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.