जालना जिल्हा विशेष शाखेने बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणार्या दोन बांगलादेशी नागरिकांचे पश्चिम बंगाल सीमेवरून निर्वासन केले आहे. रविवार दि. 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार व बांगलादेश दुतावासाशी आवश्यक पत्रव्यवहार पूर्ण करून ही कारवाई करण्यात आली आहे. बांगलादेशी नागरिक इमदार हुसेन मोहम्मद उली अहमद उर्फ सिपॉन (वय 26) आणि हुमायुन कबीर मोहम्मद उली अहमद (वय 40) हे कोणतीही वैध परवानगी नसताना भारतात घुसखोरी करून पोलीस ठाणे पारध हद्दीत राहत होते.