रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक येथे राष्ट्रीय सेवा समिती योजना व महामार्ग पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 20 जानेवारीला दुपारी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण बकाल उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्राध्यापक चेतना ओके या होत्या.