जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 या आर्थिक वर्षातील योजनानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना कळविलेल्या आहेत. जिल्ह्यातील बर्याच कार्यालयीन यंत्रणांनी तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव सादर केले नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. तरी संबंधित यंत्रणांनी तांत्रिक मान्यता तत्परतेने घेवून, तसेच प्रशासकीय मान्यता घेवून कामे विहीत मुदतीत पुर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रविवार दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता दिले.