गोदिया जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य जनजागृती!
4.2k views | Gondia, Maharashtra | Nov 26, 2025 गोदिया जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य जनजागृती! गोदिया जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या विविध योजना व कार्यक्रमांवर आधारित विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ. अभिजीत गोल्हार यांनी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, माता व बाल संरक्षण, कुटुंब कल्याण, जननी शिशु सुरक्षा, नसबंदी, कुष्ठरोग, सिकलसेल, क्षयरोग, लसीकरण, पोषण आणि आयुष्मान भारत, प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान, बाल सुरक्षा कार्यक्रम यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची सखोल माहिती दिली.