रामटेक: वडंबा जवळील सावरा गेट परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Oct 16, 2025 नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पेंच अभयारण्य क्षेत्रात वाहनांची बेफाम गती आणि संबंधित वन अधिकारी यांचे दुर्लक्ष्य वन्यजीवांवर सतत बेतत आहे. अशातच गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबरला सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर देवलापार प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या वडंबा जवळच्या सावरा गेट परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबटचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.