देसाईगंज वडसा: चोप येथे सेवा पंधरवाडा निमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न,माजी आमदार कृष्णा गजबे यांची उपस्थीती
देसाईगंज तालुक्यातील मौजा चोप येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, गांधी चौक, यांच्या वतीने आज दिनांक ३० सप्टेंबर मंगळवार रोजी दूपारी १२ ते ४ वाजेदरम्यान भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आणि आयुष्मान भारत (गोल्डन कार्ड) शिबिराचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी दुर्गा मातेचे दर्शन घेत आराधना केली.