खुलताबाद: तालुक्यातील १९,८०० शेतकऱ्यांच्या खात्यात १२.१७ कोटींचे अतिवृष्टी अनुदान जमा
सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे कापूस, मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने घोषित केलेल्या मदतीपैकी खुलताबाद तालुक्यातील १९ हजार ८०० शेतकऱ्यांच्या खात्यांत १२ कोटी १७ लाख रुपयांची अनुदान रक्कम जमा करण्यात आली आहे