चिखली: शेलगाव आटोळ भांडण मिटविण्याच्या बैठकीत गोंधळ; महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; चार जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल
शेळगाव आटोळ येथे वाद मिटविण्यासाठी आयोजित बैठकीदरम्यानच गोंधळ उडाला. बैठकीत उपस्थित असलेल्या एका महिलेला लोखंडी रॉडने तर तिच्या आईला काठीने मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, अंढेरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी मनीषा कपिल भांबळे (वय ३२, रा. कृष्णनगर, चिखली यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.