समुद्रपूर: कृषी साय्यकांच्या काम बंद आंदोलनास शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचा जाहीर पाठिंबा: युवा सेना तालुका उपप्रमुख संजय खोंडे
कृषी साय्यकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी ५ मे पासुन काम बंद आंदोलन पुकारले आहे. यासंबंधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागण्याचे निवेदन दिले आहे.मात्र अद्यापही तोडगा निघाला नसल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडे असलेल्या कामावर होत आहे.आता या आंदोलनाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने समुद्रपूर उपतालुका प्रमुख संजय खोंडे यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.