नरखेड: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर असतानाच नरखेड तालुक्यात भाजपामध्ये इनकमिंग
आज आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात नरखेड येथे भारतीय जनता पक्षात असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी उत्साहात पक्ष प्रवेश केला. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर आणि विकासाच्या ध्येयावर लोकांचा विश्वास अधिक दृढ असल्याचे स्पष्ट झाले. यादरम्यान ठाकूर यांनी नवनियुक्त कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.