महाड: महाडमध्ये रेल्वे यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमरण उपोषण..@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 29, 2025 महाड शहरात रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व महाड शहराध्यक्ष पराग वडके करत आहेत. महाड हे ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाण असूनही येथे रेल्वे सुविधा नसल्याने विकास खुंटल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक चवदार तळे आणि मुंबई-गोवा महामार्गाचे मध्यवर्ती ठिकाण अशी ओळख असलेल्या महाडमध्ये रेल्वे मार्ग यावा .