पुसद: शहरातील बजरंग नगर परिसरात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी,पुसद ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद
Pusad, Yavatmal | Oct 20, 2025 फिर्यादी संजय तांबारे यांच्या तक्रारीनुसार 18 ऑक्टोबरला रात्री अंदाजे साडेअकरा वाजता च्या सुमारास फिर्यादीचा मुलगा अंकुश तांबारे हा त्याच्या दुचाकीने जात असताना त्याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालविल्याने त्याचे नियंत्रण सुटून दुचाकी झाडाला जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. तसेच दुचाकी वर सोबत असलेला उमेश ससाने हा जखमी झाला.याप्रकरणी 19 ऑक्टोबरला अंदाजे पाच वाजताच्या सुमारास पुसद ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून घटनेची नोंद करण्यात आली.