नेर: नेर तालुका शहर व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
Ner, Yavatmal | Sep 29, 2025 नेर तालुक्यात सततच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकरी हा हवालदिल झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.नेर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा,शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी,या मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन नेर तालुका,शहर काँग्रेस व युवक कमिटीच्या वतीने देण्यात आले यावेळी निवेदनावर विनायकराव भेंडे, सत्यविजय गुल्हाने,बासित खान रत्नाताई मिसळे दिवाकर इंगोले गणेश आप्पा झाडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या होत्या..