अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी यासाठी आज जिल्हाधिकारी महोदयांना पत्र देण्यात आले. या पत्राद्वारे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असून, कोणत्याही पात्र शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहू देणार नाही याची दखल घेण्यात येईल.