महाड: रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वच 59 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणुक लढवणार..@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 29, 2025 आगामी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वच म्हणजे 59 जागांवर निवडणुक लढवण्याची तयारी राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे. तस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ठणकावुन सांगितल आहे. त्यांनी हे आव्हान खा. सुनिल तटकरे यांना दिल आहे. आमची राष्ट्रवादी ही मूळ राष्ट्रवादी आहे, त्यामुळे सुनील तटकरे यांनी स्वतःला स्वतःचीच राष्ट्रवादी असल्यासारख वागू नये असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.