कन्नड: शिवसेना उबाठा शेतकऱ्यांसाठी मैदानात; कन्नड तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
कन्नड तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या वतीने माजी आमदार उदयसिंह राजपुत यांच्या नेतृत्वात आज दि ३० स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सततच्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, पूल व सार्वजनिक संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने भरपाई करावी, शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. यासोबतच कन्नड तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी ठाम मागणी निवेदनात नमूद करण्यात आली.