सेलू: क्षीरसमुद्र शिवारातून सेंटरींगच्या लोखंडी प्लेटा चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध सेलू पोलिसांत
गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 14, 2025 तालुक्यातील क्षीरसमुद्र शिवारात सुरू असलेल्या रोडच्या कामासाठी आणलेल्या सेंटरींगच्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, प्रवीण ज्ञानेश्वर ढोले रा. आर्वी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध ता. 14 ला रात्री 12.10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.