वाई: धोम धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पुन्हा पळाले; पहिले आवर्तन सुरू होताच वाई येथे कालव्याला गळती
Wai, Satara | Nov 9, 2025 नियोजित वेळेवर गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता धोम धरणाच्या डावा कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. पण केवळ एका दिवसातच विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पुन्हा पळाले. शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी कालव्यातील प्रवाह ३५० क्युसेकपर्यंत वाढविल्यानंतर केवळ ५.२ किमी अंतरावरच वाई शहरातच मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी, सिंचन विभागाला तातडीने आवर्तन बंद करावे लागले.