राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात मोटारसायकल व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वाहनाचा चालक जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचून त्यांनी जखमीला धीर देत तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली. या मदतकार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे कौतुक केले.