हडपसर-गाडीतळ परिसरातील जय तुळजा भवानी वसाहतीत समाजकंटकांकडून वारंवार CCTV कॅमेऱ्यांची तोडफोड केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दर दोन दिवसांनी अशा घटना घडत असून त्यामुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता वाढली आहे. या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.