अमळनेर शहरातील वर्धमान नगर भागात राहणाऱ्या तरूणाच्या घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.