महाड: डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे केले अभिवादन
Mahad, Raigad | Sep 22, 2025 सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिकता यावं, यासाठी कमवा व शिका हा मुलमंत्र देऊन डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिक्षणाचा वटवृक्ष उभा केला. आज शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन पुढे आलेले विद्यार्थी देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी क्षेत्रात काम करत आहेत. याच कर्मवीर अण्णांची आज जयंती. आज पनवेल येथे सोमवारी सकाळी १० च्या सुमारास आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या जयंती निमित्त पनवेल येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.