नेर तालुक्यातील मालखेड खुर्द इंदिरानगर शिवारामध्ये जंगली जनावरांनी धुडगुस घातला असून पिके फस्त करण्याचा सपाटा लावला आहे.महिला शेतकरी निमा राठोड यांच्या शेतातील तुरीचे पीक रानडुकरासह अन्य वन्यप्राणी यांनी उद्ध्वस्त केले आहे. वनविभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.