अकोट: नगरपरिषद निवडणूक घोषणा झाल्याने आचारसंहिता लागू;2 डिसेंबर रोजी मतदान,3 डीसेंबरला मतमोजणी
Akot, Akola | Nov 4, 2025 राज्यभरातील 246 नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला यामुळे आज 4 नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झालीय तर 2 डिसेंबर रोजी अकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मतदान पार पडणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यामुळे पालिका क्षेत्रातील राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे तर अकोट नगरपालिकेत तील एकूण 35 नगरसेवक व थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक रणधुमाळी रंगणार आहे