पंढरपूर: मुसळधार पावसामुळे सेंट्रल नाका परिसरातील नागरिकांच्या घरात घुसले गटारीचे पाणी : शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे
मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंढरपूर येथील सेंट्रल नाका परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये गटारीचे पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत पंढरपूर नगर परिषदेने तात्काळ दखल घेऊन उपयोजना करण्याचे मागणी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी केले आहे. ते आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता पंढरपूर येथील सेंट्रल नाका परिसरात पत्रकारांशी बोलत होते.