कोरपना: अतिवृष्टीने कापूस सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान शरद पवार गट कोरपणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून नुकसान भरपण्याची मागणी
कोरपणा गेल्या पंधरा दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या अतिवृष्टी मुळे कोरपणा तालुक्यातील शेती हंगाम ठप्प झाला आहे सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून जमीन पूर्ण पाण्याने व्यापली आहेत तेव्हा मजुराच्या ही हाताला काम नाहीत सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत तेव्हा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना 16 सप्टेंबर रोज दुपारी तीन वाजता शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिले