मकर संक्रांतीनिमित्त कुंभली येथील सुप्रसिद्ध दुर्गाबाई डोह येथे भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर, आमदार नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष आढावा बैठक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास संपन्न झाली. या बैठकीत यात्रेच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेत, भाविकांच्या सुरक्षेला आणि सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यात्रेच्या नियोजनाबाबत नाना पटोले यांनी उपस्थित अधिकारी आणि कुंभली येथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.