धुळे: धनगर आरक्षण: संघर्षयोद्धा दीपक बोराडे धुळे दौऱ्यावर; पारोळा रोड परिसरात माध्यमांशी साधला संवाद
Dhule, Dhule | Nov 8, 2025 धनगर आरक्षण संघर्षयोद्धा दीपक बोराडे हे धुळे दौऱ्यावर आले असता, त्यांनी पारोळा रोड परिसरात माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपूर्वी दिलेल्या आरक्षणाच्या आश्वासनाचा विसर पडला असल्याची टीका करत, बोराडे यांनी सरकारला आठवण करून देण्यासाठी मुंबईवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. देशपातळीवर नेतृत्वाची पोकळी असून, धनगर बांधवांना जागृत करण्यासाठी आपला पुढील टप्पा दिल्लीच्या दिशेने असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.