गोंदिया: घराच्या अंगणातून बकऱ्या नेल्या चोरून रतनारा येथील घटना
Gondiya, Gondia | Sep 15, 2025 दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम रतनारा येथे तीर्थराज शिवप्रसाद नागपुरे (२३, रा. रतनारा) यांच्या अंगणात बांधून ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या दोन बकऱ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या बकऱ्यांची एकूण किंमत १५ हजार रूपये इतकी आहे. ही घटना रविवारी (दि.१४) दुपारी ३ वाजता उघडकीस आली असून पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास हवालदार सचिन टेंभुर्णीकर करीत आहेत.