कोपरगाव: जोहर छत्तीसगड पक्ष प्रमुख बघेल यांच्या वक्त्याव्याच्या निषेधार्थ अग्रवाल व सिंधी समाजाच्यावतीने तहसील कार्यालयाला निवेदन
जोहार छत्तीसगड पक्षाचे प्रमुख अमित बघेल यांनी अग्रवाल व सिंधी समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा कोपरगाव येथील अग्रवाल व सिंधी समाजाच्यावतीने आज ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ निषेध करून तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन दिले. अमित बघेल यांच्यावर रासुका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.प्रसंगी अग्रवाल व सिंधी समाज बांधव उपस्थित होते.