मेहकर: तरुणाई फाउंडेशन' परिवाराकडून दे. माळी येथे नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा सन्मान समारंभ संपन्न
देमाळी (जिल्हा परिषद शाळा): येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा तरुणाई फाउंडेशन परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचे मुख्य संपादक कैलास राऊत यांनी सर्व शिक्षकांना व शाळेत उपयोगी पडतील व वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने काही पुस्तके भेट दिली. व सर्व शिक्षकांचा सन्मान केला. व आपल्या हातून चांगले विद्यार्थी घडावे यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.