दक्षिण सोलापूर: वडकबाळ येथे सीना नदी पूरग्रस्तांना पोलिसांचा दिलासा: पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट...
सीना नदीच्या पूरग्रस्त परिसराला शनिवार, दि 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे भेट देऊन आपत्तीग्रस्त नागरिकांची विचारपूस केली. या वेळी पूरग्रस्त कुटुंबांना एक वेळचे जेवण, नाश्ता आणि उबदार चादरींचे वाटप करण्यात आले. कुलकर्णी यांनी नागरिकांना धीर देत सांगितले की, संकटाच्या काळात पोलीस विभाग खंबीरपणे पाठीशी उभा आहे, तसेच निसर्गाच्या प्रकोपात धैर्य न हरवता शासन यंत्रणेवर विश्वास ठेवावा.