धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने तयारीला वेग दिला आहे. काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवारांची बैठक होऊन ३० ते ३२ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले. काँग्रेस १९ प्रभागांतील ७४ जागांवर लढण्यास सज्ज असून, उमेदवारी व आघाडीबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, अशी माहिती ज्येष्ठ नेते साबीर शेख यांनी दिली.