धुळे: गजानन कॉलनी परिसरात विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी, पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 16, 2025 धुळ्याच्या गजानन कॉलनी परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय शाहिस्ता समीर शहा या विवाहितेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.