चाळीसगाव: नक्षलग्रस्त भागात धाडसी शोध: हे. कॉ. प्रशांत पाटील यांचा सपत्नीक सत्कार!
चाळीसगाव: हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे हे नेहमीच अनेक संकटे आणि आव्हाने घेऊन येते. त्यातही ती व्यक्ती नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात असेल तर ते काम अधिकच खडतर बनते. मात्र, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांनी हे आव्हान स्वीकारले आणि परराज्यातील नक्षलग्रस्त भागातून एका हरवलेल्या महिलेचा यशस्वी शोध घेऊन पोलिस खात्याची शान वाढवली. त्यांच्या याच धाडसी आणि कौशल्यपूर्ण कामगिरीबद्दल चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनैळ यांनी त्यांचा सपत्नीक स