दारव्हा: चिखली शाळेच्या जीर्ण वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याची मागणी,बहुजन मुक्ती पार्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
दारव्हा तालुक्यातील चिखली जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या वर्गखोल्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे दि. ८ नोव्हेंबरला निवेदन देऊन तातडीने नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे.